Posts

Showing posts from January, 2024

स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ मासाहेब

*राजमाता जिजाऊ माँसाहेब संकटसमयी लढणाऱ्या होत्या, रडणाऱ्या नव्हत्या!* ---------------------------- ---------------------------- राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जीवनात अनेक संकटे आली. निजामाच्या दरबारात वडील लखुजीराजे आणि बंधूंची हत्या झाली. खंडागळे यांचा हत्ती पिसाळला त्याप्रसंगी आप्तस्वकीयात जीवघेणा संघर्ष झाला. दीर शरीफजीराजे, ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे रणमैदानात धारातीर्थी पडले. पुत्र शिवाजीराजे यांना जिवे मारण्यासाठी अफजलखान आला, पन्हाळा वेढा, आग्रा कैद, पुरंदरचा तह, राज्याभिषेकाचे राजकारण असे अनेक प्रसंग जिजाऊ माँसाहेब यांनी अनुभवले, पण अशा कठीण प्रसंगी जिजाऊ माँसाहेब डगमगल्या नाहीत, हतबल झाल्या नाहीत, त्यांनी धीर सोडला नाही, संकटाने त्या गर्भगळीत झाल्या नाहीत, याउलट संकटसमयी जिजाऊ लढणाऱ्या होत्या, रडणाऱ्या नव्हत्या. संकटाला संधी समजून त्यावरती त्यांनी यशस्वी मात केली. राजमाता जिजाऊ कणखर, निर्भीड, हिंमतवान होत्या. त्या जितक्या संवेदनशील मनाच्या होत्या तितक्याच त्या स्वाभिमानी आणि लढवय्या होत्या. परकियांची चाकरी करण्यापेक्षा भूमि

कोण होत्या सावित्रीमाई

सावित्रीमाई कोण होत्या? ================ सावित्रीमाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील क्रांतिकारक योगदान:- • मुलींसाठी व अस्पृश्यांसाठी शाळा चालू करणारे पहिले भारतीय फुले दाम्पत्य होय. याप्रकारे त्यांनी शिक्षणात नवे पर्व सुरु केले. • मुलींच्या शाळांच्या पहिल्या भारतीय शिक्षिका आणि मुख्याध्यापिका. • शाळांसाठी अभ्यासक्रम नियोजन (curriculum planning) करणाऱ्या, व अभ्यासक्रम तयार करून राबविणाऱ्या पहिल्या शिक्षणतज्ञ. “अभ्यासक्रम नियोजन” हा विषय आज शिक्षणशास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिकवला जातो. • सर्व शैक्षणिक कार्य विनामूल्य करणाऱ्या पहिल्या अध्यापिका. • शिक्षणामध्ये शारीरिक शिक्षणाचा अंतर्भाव करणाऱ्या पहिल्या अध्यापिका. • शाळेत कथाकथनाची खास तासिका ठेवणाऱ्या व आनंददायी शिक्षणाच्या पहिल्या प्रवर्तक. राज्य सरकारने “आनंददायी शिक्षण” ही योजना अलीकडे राबवण्यास घेतली आहे. • त्यांनी बहुजनांसाठी देशातील पहिली “नेटिव्ह लायब्ररी” काढली होती. • त्यांनी पहिले अध्यापक प्रशिक्षण केद्र “नॉर्मल स्कूल” काढले व चालवले होते. • त्यातून “फातिमा शेख” ही पहिली मुस्लीम शिक्षिका तयार करण्याचे श्रे