Posts

Showing posts from September, 2023

देशभक्त भगतसिंग

 *बुद्धिप्रामाण्यवादी क्रांतीकारक देशभक्त भगतसिंग !* --------------------------- -डॉ.आशिष रजपूत ---------------------------                                 वयाच्या विशीतच ज्यांच्याकडे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील परिपक्वता आलेली होती, असे महान देशभक्त क्रांतिकारक भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी आताच्या पाकिस्तानातील व पूर्वीच्या अखंड भारतातील पंजाब प्रांतातील बंगा, जिल्हा लालपुर येथे एका सधन कुटुंबामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सरदार किशनसिंग तर आईचे नाव विद्यावती होते. संपूर्ण परिवार हा स्वातंत्र्यविचाराने भारावलेला होता. आजोबा,वडील, चुलते अजितसिंग हे स्वातंत्र्य लढ्यामध्ये अग्रभागी होते. भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या गदर पार्टीमध्ये ते सक्रिय होते. भगतसिंगाचे जन्म नाव भाग्यवंत असे होते. त्यांच्या आजीने भाग्यवंत असे नाव ठेवले होते. भाग्यवंत याच नावाचा अपभ्रंश पुढे भगतसिंग असा झाला.                                भगतसिंगाच्या घरचे वातावरण स्वातंत्र्याने भारावलेले असल्यामुळे स्वाभाविकपणे स्वातंत्र्यलढ्याचे बाळकडू भगतसिंगांना  वाडवडिलांकडूनच मिळाले. ब

शाक्त राज्याभिषेक

 *शाक्त शिवराज्याभिषेक आणि सत्यशोधक समाज स्थापना दिन!*                              शिवाजीराजांच्या जीवनातील क्रातीकारक घटना म्हणजे शाक्त राज्याभिषेक! शिवाजीराजांनी दुसरा राज्याभिषेक 24 सप्टेंबर 1674 रोजी करून सनातनी परंपरा नाकारली. पहिल्या राज्याभिषेक प्रसंगी सनातनी धर्माने त्यांना शूद्र ठरवून छळले, हे महान संस्कृत पंडित छत्रपती संभाजीराजे यांनी शिवाजीराजांच्या निदर्शनास आणून दिले व संभाजीराजांच्या सल्ल्यानुसार शिवरायांनी शाक्त राज्याभिषेक केला, असे प्राच्यविद्या पंडित शरद पाटील म्हणतात.                             शिवाजीराजे प्रवाहपतीत नव्हते. उठले आणि कोणाचे तरी ऐकून शाक्त राज्याभिषेक केला, असे घडले नाही. ते विचारी होते. ते विवेकी होते. ते प्रगल्भ होते. ते जसे लढवय्ये होते तसेच ते तत्वज्ञानी होते. पहिला वैदिक राज्याभिषेक केल्यानंतर त्यांनी दुसरा शाक्त राज्याभिषेक केला, याला कांहीतरी निश्चितच कारण असेल.  ते दूरदृष्टीचे राजे होते. ते सनातनी धर्माच्या विरोधात होते. ते समतावादी होते. ते महिलांचा आदर करणारे होते. ते उपेक्षित-वंचित वर्गाचे हितकर्ते होते. ते बुद्धिप्रामाण्यवादी होते, म्हणू