Posts

Showing posts from December, 2023

पंजाबराव देशमुख

 *डॉ.पंजाबराव देशमुख : कर्तृत्ववान, विद्वान लोकनेता !* ------------  ज्यांनी लंडनमध्ये जाऊन प्राच्यविद्येत पीएच.डी. मिळवली. तेथेच बॅरिस्टर झाले व मायभूमीत येऊन कृषी, शैक्षणिक, सामाजिक परिवर्तन, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात धोरणात्मक कार्य केले. अशा जागतिक कीर्तीच्या डॉ.पंजाबराव देशमुख यांच्याबाबत बहुतांश महाराष्ट्रीयन मात्र अनभिज्ञ असावेत, ही बाब अत्यंत दुःखदायक आहे.                                       डॉ.पंजाबराव देशमुख यांचा जन्म 27 डिसेंबर 1898 रोजी अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी कदम देशमुख या घराण्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शामरावबापू तर आईचे नाव राधामाई होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच म्हणजे पापळ येथे तर माध्यमिक शिक्षण कारंजा लाड आणि अमरावती येथे झाले. लहानपणापासून त्यांना शिक्षणाची प्रचंड आवड होती. बालपणापासून शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रचंड पगडा त्यांच्या मनावर होता. त्यामुळे अध्ययनाची चिकाटी त्यांनी सोडली नाही. त्यांचे उच्च शिक्षण पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. पुढे ते उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. आपल्या मुलान