Posts

Showing posts from October, 2023

घटस्थापना

 *घटस्थापना-नवरात्रोत्सव शेतीचा शोध लावणाऱ्या महामातांचा सन्मान                               निसर्गातील कोणताही सजीव हा स्वतंत्रपणे तयार झाला नाही, तर तो प्रत्येक टप्प्यावर उत्क्रांत होत आलेला आहे, ती एक रासायनिक प्रक्रिया आहे, असे जगविख्यात मानवशास्त्रज्ञ (Anthropologist) डार्विन यांचे मत आहे. मानव हा देखील निसर्गातील एक प्राणीच आहे. तो देखील उत्क्रांत होत आलेला आहे. एका विशिष्ट टप्प्यावर तो मानवासारखा दिसायला लागला. सुरुवातीच्या अवस्थेला एस्ट्रोलोपिथिकस असे मानवशास्त्रज्ञांनी त्याला नाव दिले. तिथपासून आजपर्यंत सुमारे 40 ते 25 लाख वर्षांचा प्रवास आहे, असे मानले जाते. सुमारे 70 हजार वर्षांपूर्वी बोधात्मक क्रांती (cognitive revolution) झाल्यानंतर त्याचा विकासाचा वेग झपाट्याने वाढला.                             भटक्या अवस्थेतला माणूस स्थिर कसा झाला, तर त्याला शेती हेच महत्त्वाचे कारण आहे. पेरलेले उगवते हे प्रथमता स्त्रीच्या लक्षात आले, हा काळ आतापासून सुमारे दहा हजार वर्षांपूर्वीचा म्हणजेच नवाश्मयुगाचा ( Neolithic ) काळ आहे. जगविख्यात प्राच्यविद्यापंडित शरद पाटील म्हणतात  "प्रसवक्ष