Posts

Showing posts from July, 2023

साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे

 *साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे :    ज्यांच्या वाट्याला फक्त दीड दिवसाची शाळा आली त्याच साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांनी साहित्यक्षेत्रात जागतिक स्तरावर स्थान मिळविले. त्यांची साहित्य संपदा जगातील सुमारे 22 भाषांत अनुवादित झालेली आहे.                                            त्यांची चित्रा, सुलतान या कादंबऱ्या रशियामध्ये घरोघरी वाचल्या जातात, तर त्यांनी लिहिलेला स्टॅलिनग्राडचा पोवाडा रशियातील घराघरात, गावागावात आणि शाळा-महाविद्यालयात गायला जातो. इतका तो प्रेरणादायी आणि लोकप्रिय आहे. साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांनी 15 पोवाडे, एक नाटक, दहा लोकनाट्य, एक प्रवास वर्णन, तेवीस कथा आणि सुमारे 40 कादंबऱ्या लिहिल्या आहेत. इतका प्रतिभासंपन्न आणि बहुविध साहित्यिक मराठी भाषेत दुसरा झाला नाही.                                               प्राच्यविद्यापंडित शरद पाटील म्हणतात, "अण्णा भाऊंच्या कादंबरीची तुलना करणारी भारतीय भाषात दुसरी कादंबरी नाही. अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरीची तुलना रशियन कादंबरीकार दोस्तोएवस्की यांच्याशीच होऊ शकते." यावरून स्पष्ट होते की अण्णा भाऊ साठे हे केवळ मरा