Posts

Showing posts from May, 2023
 *धैर्यशाली, शौर्यशाली, लोककल्याणकारी अहिल्याबाई होळकर !*     छत्रपती शाहू महाराज (पहिले) यांच्या प्रेरणेने देशभर मराठा साम्राज्य निर्माण झाले.त्यांनी दिलेल्या संधीमुळे अनेक कर्तृत्ववान घराण्यांनी पराक्रम गाजविला, त्यापैकी इंदौरचे होळकर हे पराक्रमी, लोककल्याणकारी आणि लोकप्रिय घराणे आहे. या घराण्यातील अत्यंत कर्तृत्ववान, करारी, स्वाभिमानी, निर्भीड, पराक्रमी, प्रजावत्सल, उत्तम प्रशासक, मुत्सद्दी महाराणी म्हणजे अहिल्याबाई होळकर !                                  पती निधनानंतर सती न जाता होळकरांच्या महान साम्राज्याचे रक्षण करून ते वृद्धिंगत करण्याचे महान कार्य अहिल्याबाईंनी केले. त्यांच्या जीवनात दुःखाची मोठी मालिका आहे. त्यांच्या जीवनात अनेक संकटे आली. उत्तर भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित करणारे सासरे सुभेदार मल्हारराव होळकर यांचे १७६६ साली निधन झाले. पती खंडेराव होळकर हे १७५४ साली कुंभेरीच्या वेढयात लढता लढता धारातीर्थी पडले.याप्रसंगी अहिल्याबाई फक्त २९ वर्षाच्या होत्या. एकुलता एक पुत्र मालेराव यांचे १७६७ अकाली अकाली निधन झाले. १७८७ साली नातू नथोबा,१७९१ साली जावई यशवंतराव फणसे आणि कन्या
*स्वराज्यविस्तारक-प्रजावत्सल छत्रपती शाहू महाराज (पहिले)* (१८ मे १६८२  - १५ डिसेबर १७४९)     आपणा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांचा इतिहास माहिती असतो, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू, संभाजीपुत्र शाहू महाराज यांचा इतिहास बहुतांश लोकांना माहीत नसतो, असला तरी अत्यंत त्रोटक पद्धतीने माहित असतो. प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याचे रक्षण करून त्याला विशाल अशा मराठा साम्राज्यात रूपांतरित करण्याचे आणि शक्यतो कोणाचेही मन न दुखवता, सर्वांना अत्यंत मायेने, ममतेने, प्रेमाने, शक्यतो अंतर्गत संघर्ष टाळून त्यांनी ते निर्माण केले, हे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य आहे.                                  संभाजीराजांच्या निर्दयी हत्येनंतर जवळ जवळ शिवरायांनी निर्माण केलेले रयतेचे स्वराज्य संपुष्टात आले, असे मोगलांना वाटत असतानाच छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती ताराराणी यांनी त्या स्वराज्याला सावरले, पण त्या स्वराज्याचे विशाल अशा म्हणजे अटकेपासून बंगालपर्यंत आणि  त्रिचिरापल्लिपासून लखनौपर्यंत विशाल मराठा साम्राज्यात रूपांतर करण्याचे महान कार्य छत्रपती शाहू महाराज
#पराक्रमी नीतिमान छत्रपती संभाजीराजे* शिवरायांच्या मृत्यूनंतर न थकता सतत नऊ वर्षे मोगल, आदिलशाहा, सिद्दी, पोर्तुगीज आणि अंतर्गत शत्रूंविरुध्द संभाजीराजे लढत होते. संभाजीराजांनी मोगल फौजांना, साक्षात औरंगजेबाला सळो की पळो करून सोडले. औरंगजेब हतबल झाला. त्याने डोक्यावरील किमॉश खाली उतरवला आणि ‘संभाजीचे पारिपत्य केल्याशिवाय तो डोक्यावर धारण करणार नाही,’ अशी शपथ घेतली होती. अशा पराक्रमी, नीतिमान छत्रपती संभाजी महाराज यांची आज (दि. १४) जयंती त्यानिमित्त..                           छत्रपती संभाजीराजांचे कार्यकर्तृत्व केवळ महाराष्ट्राच्या चौकटीत मावणारे नव्हते. संभाजीराजांनी बालवयातच म्हणजे वयाच्या आठव्या वर्षी जयसिंगाच्या छावणीत जाऊन आपला निर्भीडपणा दाखवला होता. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी गुजरात मोहीम यशस्वी केली, असे समकालीन ऍबे करे सांगतो. संभाजी महाराज म्हणजे पराक्रमी, सुंदर आणि बुध्दिमान राजपुत्र होते, असे करे सांगतो.                           शिवरायांच्या मृत्यूनंतर न थकता सतत नऊ वर्षे मोगल, आदिलशाहा, सिद्दी, पोर्तुगीज आणि अंतर्गत शत्रूंविरुध्द संभाजीराजे लढत होते. संभाजीराजांनी मो
*कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतीदिना निमित्त विनम्र अभिवादन* "रयत" हा शब्द मराठी संस्कृतीच्या जिव्हाळ्याचा शब्द आहे. मूळ अरबी भाषेतील असणाऱ्या शब्दाने मराठी भाषिकांना आकर्षित केले आहे. रयत म्हटले की एक आपुलकीची भावना मराठी भाषिकांच्या मनात निर्माण होते. कारण छत्रपती शिवाजीराजांनी जे राज्य निर्माण केले, त्या राज्याला रयतेचे राज्य असे म्हटले जाते. रयत म्हणजे सर्व जनता! त्यामध्ये भेदभाव नाही.                            छत्रपती शिवाजीराजांनी कृषी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रांमध्ये समतेचा पाया घातला. तीच परंपरा शैक्षणिक क्षेत्रामध्ये 1919 साली रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू ठेवली.                             कर्मवीर भाऊराव पाटील हे शैक्षणिक क्षेत्रातील रयतेचे तत्वनिष्ठ शिक्षणमहर्षी आहेत. कर्मवीरांचे कार्य हे सर्व जाती-धर्मांसाठी होते. रयतेच्या शिक्षणाची माऊली म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील होत. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, महाराजा सयाजीराव गायकवाड, राजर्षी छत्रपति शाहूजी महाराज यांच्या कार्याचा वारसा शैक्षणिक क्षेत्रामध्य
*लोककल्याणकारी राजर्षी छत्रपती शाहू महाराज* -छत्रपती शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कसबा बावडा येथे झाला.1884 साली ते छत्रपतींच्या कोल्हापूर गादीवरती दत्तक म्हणून आले.1884 ते 1894 या दहा वर्षात त्यांनी राजकोट आणि धारवाड या ठिकाणी उच्च शिक्षण पूर्ण केले. 1894 साली त्यांचा राज्याभिषेक झाला.                                    राज्याभिषेकानंतर त्यांनी आपल्या राज्याचा दौरा केला. डोंगरदऱ्यात राहणाऱ्या कष्टकरी, श्रमकरी, शेतकरी, वंचित, उपेक्षित, भूमिहीन प्रजाजनांचे दुःख पाहून त्यांचे मन हेलावले,  छत्रपतीच्या अंतःकरणामध्ये  प्रचंड वात्सल्य होते. ते जसे स्वाभिमानी होते, तसेच ते प्रेमळ होते. आपल्या राज्यात अमुलाग्र बदल करण्याचा संकल्प त्यांनी केला. राज्यारोहणामुळे शाहू महाराजांचा सत्कार पुण्यातील सार्वजनिक सभेने आयोजित केला होता, त्यादरम्यानच पुण्यात हिंदू-मुस्लिम दंगल झालेली होती आणि या दंगलीला टिळकाची मदत होती, टिळक हे वयाने शाहू महाराजांपेक्षा वीस वर्षांनी मोठे होते. सत्कार प्रसंगी शाहू महाराज म्हणाले "हिंदू-मुस्लिमांनी एकोप्याने राहावे, भांडण करू नये" शाहू महाराजांची वयाच्या
*जगाला युद्धाची नव्हे, बुद्धाची गरज!* तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म ईसपू. 563 साली लुम्बिनी या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव राजा शुध्दोदन तर आईचे नाव महामाया होते. मातेचे सातव्या दिवशी निधन झाल्यानंतर त्यांचा सांभाळ मावशी तथा सावत्र माता गौतमीने अत्यंत प्रेमाने केला. बुद्धाचे मूळ नाव सिद्धार्थ होते. *अशक्य कार्य सिद्धीस नेणारा म्हणजे सिद्धार्थ होय*. तसेच त्यांना *भगवा* या नावानेदेखील ओळखले जात असे. भगवा म्हणजे महान. भगवा हा पाली भाषेतील शब्द आहे. कारुण्य आणि प्रेम यांनी त्यांचे व्यक्तिमत्व ओतप्रोत भरले होते.                      सिद्धार्थला तत्कालीन सर्व प्रकारचे शिक्षण देण्यात आले. त्यांचा विवाह यशोधरेबरोबर झाला. त्यांना राहुल नावाचा मुलगा होता. सिद्धार्थ राजपुत्र होते. ऐश्वर्य त्यांच्या पायात लोळत होते. परंतु मानवी समुदयात असणाऱ्या दुःखाने ते अस्वस्थ होते. दुःख नष्ट होऊन सर्वांना सुख मिळावे, या उदात्त हेतूने त्यांनी गृहत्याग करण्याचा निर्णय घेतला.                                        ऐन तारुण्यात म्हणजे तिशीत असताना त्यांनी सुंदर राजवाडा, सुंदर महाराणी, सुंदर पुत्र आणि आनंददाय
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर और मजदूर दिवस  मजदूर दिवस या मई दिवस पूरे विश्व में मनाया जाता है और यह उन श्रमिक वर्गों का उत्सव है जिन्हें अंतर्राष्ट्रीय श्रम आंदोलनों द्वारा बढ़ावा दिया जाता है।  भारत में अगर श्रमिकों को कोई अधिकार मिला है, तो यह डॉ. आंबेडकर की वजह से है इसलिए मजदूर दिवस पर डॉ. अंबेडकर को याद नहीं करना डॉ. आंबेडकर की विरासत के साथ अन्याय होगा।  समाज के प्रति डॉ. आंबेडकर का योगदान बहुत बड़ा है, लेकिन लगभग सभी लोग एक श्रमिक नेता के रूप में डॉ. आंबेडकर की भूमिका की उपेक्षा करते हैं।  श्रम विभाग की स्थापना नवंबर 1937 में हुई थी और डॉ. आंबेडकर ने जुलाई 1942 में श्रम विभाग का कार्यभार संभाला था। सिंचाई और बिजली के विकास के लिए नीति निर्माण और योजना प्रमुख चिंता थी।  यह डॉ. आंबेडकर के मार्गदर्शन में श्रम विभाग था, जिसने बिजली प्रणाली विकास, हाइडल पावर स्टेशन साइटों, हाइड्रो-इलेक्ट्रिक सर्वेक्षणों, बिजली उत्पादन और थर्मल पावर स्टेशन की समस्याओं का विश्लेषण करने के लिए "केंद्रीय तकनीकी पावर बोर्ड" (CTPB) स्थापित करने का निर्णय लिया था।  यदि भारत में मजदूरों के अधिकारों को ह