देशभक्त भगतसिंग
*बुद्धिप्रामाण्यवादी क्रांतीकारक देशभक्त भगतसिंग !* --------------------------- -डॉ.आशिष रजपूत --------------------------- वयाच्या विशीतच ज्यांच्याकडे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील परिपक्वता आलेली होती, असे महान देशभक्त क्रांतिकारक भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी आताच्या पाकिस्तानातील व पूर्वीच्या अखंड भारतातील पंजाब प्रांतातील बंगा, जिल्हा लालपुर येथे एका सधन कुटुंबामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सरदार किशनसिंग तर आईचे नाव विद्यावती होते. संपूर्ण परिवार हा स्वातंत्र्यविचाराने भारावलेला होता. आजोबा,वडील, चुलते अजितसिंग हे स्वातंत्र्य लढ्यामध्ये अग्रभागी होते. भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या गदर पार्टीमध्ये ते सक्रिय होते. भगतसिंगाचे जन्म नाव भाग्यवंत असे होते. त्यांच्या आजीने भाग्यवंत असे नाव ठेवले होते. भाग्यवंत याच नावाचा अपभ्रंश पुढे भगतसिंग असा झाला. ...